चिमुकलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तंबाखूची पुडी आणण्याचे सांगून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला जळगाव जिल्हा न्यायालयान १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रूपयांचा दंड सुनावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका खेडे गावात पाच वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चिमुकली ही खेळत होती. त्यावेळी भगवान शंकर करपे (वय-५०) याने मुलीला  तंबाखूची पुडी घेण्यासाठी दुकानावर पाठविले. मुलीने तंबाखूची पुडी देण्यासाठी गेली असता आरोपी भगवान करपे याने तिचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुनह्यातील भगवान शंकर करपे याला अटक करण्यात आली होती. जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश डी.वाय.काळे यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. या खटल्यात एकुण सात साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीतेसह तिच्या आजीची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने भगवान करपे याला दोषी ठरवत विविध कलमान्वये १० वर्षाचा सश्रम कारावास आणि ५ हजाराची दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्याचा सश्रम कारावास  अशी शिक्षा सुनावली आहे.

 

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील चारूलता बोरसे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी म्हणून गणेश नायकर यांनी सहकार्य केले.

Protected Content