यावल महाविद्यालयात कर्तुत्वान महिलांचा सत्कार

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । विद्यार्थी विकास विभागांतर्गत जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कष्टकरी महिलांचा गौरव करून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.

यावल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकाने संशोधन क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल मानद डीलीट पदवी दिल्याबद्दल यावल येथील कला महाविद्यालयाच्या वतीने शॉल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच डॉ.सुधा खराटे व ज्योती पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला. उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. प्रा. संजय पाटील यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. तसेच त्यांनी मतदानात महिलांची संख्या वाढावी या उद्देशाने १८ वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करावी व  आपल्या परिसरातील महिलांमध्ये त्यासंदर्भात जनजागृती करावी, असे आवाहन केले.

डॉ.संध्या सोनवणे यांनी सत्काराला उत्तर देताना विचार मांडले की समाजात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. आजही विविध क्षेत्रांमध्ये महिला आपल्या क्षमता सिद्ध करीत आहेत. त्यांचे चरित्र वाचून, त्याच्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपली क्षमता वाढवावी.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी केले तर आभार डॉ.एस .पी.कापडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.एस.आर. गायकवाड, मिलिंद बोरघडे, प्रा. मनोज पाटील, डॉ.पी.व्ही.पावरा यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content