ब्रेकिंग : केंद्रानंतर आता राज्य सरकारचाही पुढाकार ; पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता राज्यानेही पुढकार घेत पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे.

शनिवार, दि.२१ मे रोजी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या दरात 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले असून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

केंद्राने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारवरही दडपण होते, त्यानंतर आज पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला, असं बोललं जात आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

 

Protected Content