भरडधान्य शासकीय खरेदी नोंदणी केंद्र धरणगावात सुरु करा:-भाजपची मागणी

धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी | तालुक्यात भरडधान्याची शासकीय खरेदीची नोंदणी पाळधी येथे सुरू करण्यात आली त्याच प्रमाणे धरणगावात देखील सुरु करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार नितीन देवरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की. धरणगाव तालुक्यातील शासकीय खरेदीची नोंदणी ही तालुक्याच्या ठिकाणी धरणगाव येथे सुरू करणे गरजेचे आहे. कारण धरणगाव लगत अनेक लहान मोठे गावे जवळ असून तेथील शेतकऱ्यांना धरणगावात नोंदणीसाठी येणे सोयीचे होईल. शेतीचे कामे सोडून पाळधी येथे फक्त नोंदणीसाठी जाणे येणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. शेतकऱ्यांना होणार त्रास लक्षात घेऊन भरडधान्य शासकीय खरेदी केंद्र धरणगावात सुद्धा सुरू करावे असे निवेदन तहसीलदार नितीन देवरे यांना देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते शिरीषआप्पा बयस,ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,अँड.वसंतराव भोलाने,प्रकाशदादा सोनवणे,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,शरद अण्णा धनगर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील,कन्हैया रायपूरकर,राजू महाजन,मधुकर पाटील,विशाल पाटील,इत्यादी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content