एमआयएमचा आमदार म्हणतो… पहिले मत नाथाभाऊंनाच !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानपरिषद निवडणुकीच्या हालचाली शेवटच्या टप्प्यात आल्या असतांना धुळ्यातील एमआयएमच्या आमदाराने आपले पहिले मत एकनाथराव खडसे यांना टाकणार असल्याची माहिती दिली आहे.

 

विधानपरिषद निवडणुकीत एमआयएम आणि समाजवादी पक्षाची प्रत्येकी दोन अशी चार मते खूप महत्वाची मानली जात आहे. हे दोन्ही पक्ष मविआला मतदान करणार असल्याची प्राथमिक माहिती असली तरी पहिला आणि दुसरा प्राधान्यक्रम कसा असेल याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. यातच आज एकनाथराव खडसे हे आवश्यक असणार्‍या मतांपेक्षा जास्त मतांची बेगमी करण्यासाठी गाठीभेटी घेत असल्याचे दिसून येत आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार थांबलेल्या हॉटेल ट्रायडंटवर धुळे येथील एमआयएमचे आमदार फारूक शाह गेले आहेत.

 

फारूक शाह यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन आपले पहिले मत हे एकनाथराव खडसे यांना टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. नाथाभाऊ हे खान्देशचे मान्यवर नेते असून आमच्या भागासाठी केलेल्या कामामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार फारूक शाह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!