धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने २१ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे. याबाबत पाचोरा लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

जयवंत नरेंद्र चौधरी (वय-२१) रा. उत्राण ता. एरंडोल असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील रहिवाशी जयवंत नरेंद्र चौधरी हा रविवारी १९ जून रोजी दुपारच्या सुमारास पाचोरा रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ३७०/३० जवळ अप लाईनवरून रेल्वे क्रॉसींग करत असतांना धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला त्यात जयवंतचा जागीच मृत्यू झाला. जयवंत हा ट्रक्टरवरुन मजुर पोहचविण्याचे काम करत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता.  त्याच्या पाश्चात्य वृद्ध आई, एक विवाहित बहिण असा परिवार असुन जयवंत याचे अकस्मात निधनाने उत्राण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास चाळीसगाव लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे एपीआय किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष बोरसे हे करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!