पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

नवी दिल्ली | एका सर्वेक्षणातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी   हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. जवळपास ७१ टक्के रेटिंगसह आवडत्या नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव अव्वलस्थानी आहेत.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. १३ जागतिक नेत्यांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांचा क्रमांक लागतो, ज्यांना ४३ टक्के रेटिंग मिळाली आहे. तर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के रेटिंग मिळाली आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्येही जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर होते. वेबसाइट सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारी नेते आणि देशाच्या नेत्यांचे रेटिंग ट्रॅक करते.

ताजी रेटिंग १३ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान संकलित केलेल्या डेटाच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे.

Protected Content