रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचा मोठा फायदा होईल- बिडीओ दिपाली कोतवाल

रावेर प्रतिनिधी । रावेर अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनने प्रशासनाला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन भेट देऊन सामाजिक भान जपण्याचे काम केले असून तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचा मोठा फायदा होईल, असे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी सांगितले.

रावेर येथिल दिवाणी न्यायाधीश आर. एल. राठोड यांचे संकल्पनेतून रावेर वकील संघाने व न्यायालयीन कर्मचारी यांनी निधी गोळा करून प्रशासनाला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर लोकार्पण करण्यात आले.

यावेळी न्या.आर. एल. राठोड, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, नायब तहसिलदार पवार, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, रावेर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. जगदीश महाजन, सचिव धनराज ई. पाटील, ऍड, व्ही.पी.महाजन, ऍड. प्रविण पासपोहे, ऍड. एस. एस. सैय्यद, ऍड. मधुसूदन चौधरी, ऍड. विपीन गडे, ऍड. जे. जी. पाटील, ऍड. योगेश गजरे, ऍड. गणेश अजनाडकर,ऍड. रमाकांत महाजन, ऍड. तुषार चौधरी, ऍड. के. बी. खान यांचे सह पत्रकार बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन ऍड. योगेश गजरे यांनी केले तर आभार ऍड. धनराज ई. पाटील यांनी मानले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.