पहूर येथे दिव्यांग बांधवांना रोख स्वरूपात आर्थिक मदत

पहूर , ता जामनेर प्रतिनिधी । पहूर येथील सहकार महर्षी स्वर्गीय कृषी पंडित मोहनलालजी लोढा यांच्या ९ व्या पुण्यतिथी आज कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फ दिव्यांग बांधवांना रोख स्वरुपात आर्थिक मदत देण्यात आली.

पहूर येथील कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेत  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे होते .यावेळी सर्वप्रथम  स्व. कृषी पंडित मोहनलालजी लोढा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.

यावेळी माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा ,  व्यवस्थापक कैलास पाटील ,  राष्ट्रवादी युवक  कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश पाटील , अॅड. एस आर. पाटील, पहूर कसबे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करवंदे, राजू जेंटलमन, किरण पाटील, पत्रकार रविंद्र लाठे , दिव्यांग संघटनेचे रवि झाल्टे आदींनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी सामाजिक भावनेतून पहूर – पाळधी परिसरातील सुमारे २०० दिव्यांग बांधवांना २५१ रुपये प्रमाणे रोख स्वरूपात मदत करण्यात येणार असल्याचा निर्णय पतसंस्थेने घेतल्याचे प्रदीप लोढा यांनी सांगीतले. 

प्रतिनिधीक स्वरूपात काही दिव्यांग बांधवांना आज मदत सुपूर्द करण्यात आली असून  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्वरीत दिव्यांग बांधवांच्या घरी जावून मदतीचा हात दिला जाणार आहे. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन  बाबुराव पांढरे, संचालक योगेश बनकर, उपसरपंच श्याम सावळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे, विवेक जाधव, अरुण घोलप यांच्यासह संस्थेचे संचालक, हितचिंतक उपस्थित होते.

सुत्रसंचालन संचालक प्रल्हाद वानखेडे यांनी तर आभार व्यवस्थापक कैलास पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी अशोक देठे, प्रमोद पाटील, अमित पाटील, ईश्वर बारी, जनार्धन घुले, रामेश्वर पगारे, पंकज धुळसंधिर आदीनी सहकार्य केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.