पुर्णा नदीला पुर ; नांदुरा व जळगाव तालुक्याचा संपर्क तुटला

bulthana 1

बुलढाणा प्रतिनिधी । तालुक्यात सतत ३६ ते ३७ तासांपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे जळगाव व नांदुरा रोडवरील पूर्णा नदीला पुर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे नांदुरा व जळगाव तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव, जामोद व नांदुरा मार्गावरील माणेगाव जवळ असलेल्या पुर्णा नदीला पुर आलेला असून दोन ते तीन फुट पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे जळगाव जामोद-नांदुरा मार्गावरील वाहतुक पुर्णत: बंद झाली आहे. पुर्णा नदीचा उगम मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून झालेल्या आहे. पुर्णा नदीपात्रात दुथडीभरुन वाहत असून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. यामुळे जळगाव जामोद नांदुरा मार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे लोकांना मलकापूर कुरहा मार्गावरील धोपेश्वर जवळील पुर्णा नदिच्या पुलावरुन ये-जा करावी लागत आहे. पुलारवरून दोन ते तीन फुट पाणी वाहत असून पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मोठा पुर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या संततधार पावसामुळे सुरुवातीला शेतकरी हा आनंदित झाला होता. परंतु या पावसासोबत हवेचे प्रमाण जास्त असल्यामुळे उभे पिके झोपण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.

Protected Content