नागादेवी पाझर तलाव ‘ओव्हर फ्लो’; गळतीमुळे फुटण्याचा धोका (व्हिडीओ)

yawal dharan futnar

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव व पंचकोशीतील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले नागादेवी पाझर तलाव मागील ३० तासापासून संततधार पाऊसामुळे हा पाझर तलाव ओव्हर फ्लो झाले आहे. मात्र ओसंडून वाहत असल्याने पाझरच्या खालील भागातुन पाण्याची गळती होत असल्याने धोका निर्णाण झाला आहे.

यावल प्रशासनाकडून दखल
पाश्वभुमीवर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असुन विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी तात्काळ या ठिकाणी पहोचले आहे.या नागादेवी पाझर तलावाचे मागील वर्षीच सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून दुरूस्तीचे काम करण्यात आले. मात्र पुनश्च या तलाव कुटीच्या मार्गावर दिसून येत आहे. ठेकेदाराने केलेल्या या कामांवर व गुणवतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहे. नागादेवी फुटल्यास याचा परिणाम या परिसरातील शेतीवर होईल. या पाझर तलावाच्या फुटीमुळे या क्षेत्रातील काही पाडयांना व गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या परीसरातील नागरीकांमध्ये भिती व्यक्त होत आहे.

परीसरात दहशत
हाच नागादेवी पाझर तलाव हा २००६ यावर्षी अतिवृष्टीमुळे रात्रीच्या वेळीस फुटल्याने सावखेडा सिम तालुका यावल येथील नाल्याच्या काठीवर असलेली घरे पुर्णपणे वाहुन गेली होती. यावेळी अनेकांचे संसार उघडयावर पडून जवळपास एक ते दिड कोटी रुपयांचे नुकसान होवुन यात एक महीला या पाण्यात वाहुन गेली होती. त्यावेळेस नुकसान झालेल्या सावखेडे सिमकरांना शासनाकडुन पंचनामे करून सुमारे ६५ लाख रुपयांची मदत त्या वेळेस देण्यात आली होती. त्या घटनेनंतर नागादेवी पाझर तलाव हा दुर्लक्षी करण्यात आला होता. मात्र मागील एक ते दिड वर्षात सावखेडा सिम, दहिगाव येथील शेतकरी बांधवांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी या पाझर तलावास दुरुस्त करावे, या मागणीला घेवुन विविध प्रकारची आंदोलन व आमरण उपोषण केल्याने अखेरीस शासनाने या १३ वर्षापासुन दुर्लक्षीत असलेल्या नागादेवी पाझर तलावा करीता त्यावेळेस खासदार व आताचे आमदार हरीभाऊ जावळे आणीचोपडा मतदारसंधाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन मागील वर्षी पाझर तलावास दुरुस्तीसाठी सुमारे ९९ लाख रुपयांचा निधी तात्काळ मंजुर करून ठेकेदाराच्या माध्यमातुन या नागादेवी पाझर तलावाची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली होती. मात्र मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने हा पाझर तलाव भरलाच नाही.

कामाच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी
मात्र यावेळी मागील १५ दिवसांपासुन तालुक्यासह सावखेडा सिम या परिसरात संततधार पाऊस होत असल्याने हा नागादेवी पाझर तलाव जवळपास भरला असल्याने अचानक या पाझर तलावाची गळती सुरू झाली आहे. शासनाने या पाझर तलावामुळे संभाव्य धोका लक्षात घेता काही लोकांना सुरक्षीतस्थळी पाठवण्यात आले आहे. या पाझर तलावाच्या संभाव्य फुटीमुळे धोका निर्माण होणाऱ्या गावानां सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या कामाच्या गुणवतेला घेवुन शेतकरी बांधव प्रचंड नाराज असल्याचे दिसुन येत आहे.

 

Protected Content