भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी नदीच्या काठावरील कासवा गावातील तरूणाचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, कासवा ता. यावल येथील शुभम सपकाळे या तरूणावर अकलून येथे चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच काल सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, आज सकाळी शुभमचा मृतदेह घेऊन त्याचे आप्तस्वकीयांसह अकलूद येथील नागरिकांनी टोल नाक्याजवळच्या चौकात रस्त्यावरच ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शुभमच्या तीन मारेकर्यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर, ठिय्या मांडल्यामुळे तिन्ही रस्त्यांवर वाहनाची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून आले.