अमळनेर येथे बहुचर्चित अशा दगडी दरवाजाचे उद्या भूमिपूजन

 

अमळनेर प्रतिनिधी।  येथील बहुचर्चित अशा दगडी दरवाजाचे भूमिपूजन २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता पाटील असतील.

शासनाने नगरपरिषदेकडे दगडी दरवाजाचे देखभाल व दुरीस्तीचे काम पुढील १० वर्षासाठी हस्तांतरित केले आहे. दगडी दरवाज्याच्या कामामुळे राज्य महामार्ग क्र. १५ वरील रहदारीचा मोठा प्रश्न सुटणार आहे.या कामामुळे शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडणार आहे. भूमिपूजन कार्यक्रम सर्व नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन नगरपरिषदे मार्फत करण्यात येणार आहे.

Protected Content