कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने निंबध लेखन स्पर्धा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन याच नितित्ताने घोषवाक्य व निबंध स्पर्धा सह विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

येत्या दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदान दिन’ म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जात आहे.
या निमित्ताने यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध स्पर्धाचे आयोजन प्र. प्रा. डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यासाठी महाविद्यालयात मतदार साक्षरता मंडळ तयार करण्यात आले असून या मंडळाचे नोडल अधिकारी प्रा. संजय डी. पाटील यांच्या वतीने घोषवाक्य व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला यावलच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी.पाटील, प्रा.एम.डी. खैरनार, प्रा.डॉ.आर.डी.पवार, प्रा.एच.जी.भंगाळे, प्रा.मनोज पाटील, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.संतोष जाधव ,प्रा.कामडी प्रा. पी. व्ही.पावरा, प्रा.प्रतिभा रावते इतर उपस्थित होते.

यात महाविद्यालयातील एकूण २६ विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक-नयना संजय बारी,द्वितीय क्रमांक-दीपाली प्रमोद ढाके व तृतीय क्रमांक-जयश्री संजय सोळंके ह्या विद्यार्थिनींनी मिळविला तर घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक- जयश्री नारायण धनगर, द्वितीय क्रमांक-स्वाती संजय बाविस्कर व तृतीय क्रमांक-संध्या समाधान कोळी ह्या विद्यार्थिनींनी मिळविला

Protected Content