अमळनेर प्रतिनिधी । येथील व्यापारी संकुलात मध्यरात्रीच्या सुमारास एका तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना होती. याप्रकरणातील आरोपीस हत्यार व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाकडून २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास पांडुरंग शिंगाणे (भोई) (वय 42 वर्षे रा. शिवमनगर बहादरपुर रोड अमळनेर ) असे आरोपीचे नाव असून पोलीस स्टेशन भाग 5 गुरन 361/2021 भादवि कलम 302 प्रमाणे दि.27 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. न्यायलयाकडुन दि.28 ते 30 ऑगस्ट व नंतर दि. 02 सप्टेंबर रोजी पोलीस कस्टडी रिमांड वाढविण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात मयत प्रकाश दत्तात्रय चौधरी (वय 32 रा. जुना पारधीवाडा अमळनेर) याने अमळनेर शहरातील तांबापुरा भागात टी.व्ही.चे केबल वायर टाकण्याचे काम घेण्याकरीता आरोपीतास गेले 1 वर्षापुर्वी एक लाख रुपये दिले होते. परंतु तो सदरचे पैसे देखील परत करत नसल्याने मयत प्रकाश चौधरी हा त्याच्याकडे पैसे परत मागण्याकरीता तगादा लावीत असता आरोपी मजकुर यांने नियोजन बध्द रित्या दिनांक 26/08/2021 रोजी रात्री 11.30 वा. चे सुमारास अमळनेर शहरात मंगलमुर्ती चौकालगत असलेल्या हाशिमजी प्रेमजी कॉम्पलेक्स मधील दुस-या मजल्यावर आरोपीताची भोईराज आईस्क्रिम पार्लर आता केबल असलेल्या दुकाना समोर सार्व.जागी.यातील मयत प्रकाश दत्तात्रय चौधरी यास बोलावुन व्हरांड्यात चाकुने गळ्यावर वार करुन त्यांस जिवानिशी ठार मारुन टाकले आहे.
सदर गुन्ह्याचे घटनास्थळावर प्रविण मुंढे पोलीस अधिक्षक जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग राकेश जाधव, यानी भेट देवुन गुन्ह्याचे तपास कामी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक अमळनेर याचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास राकेश सिग परदेशी , रापोनि अमळनेर व पथकाने केला आहे.
गुन्हा दाखल झालेनंतर अवघ्या 4 तासाच आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये अॅन्ड्रोईड मोबाईल फोन, एच एफ डिलक्स हिरो कंपनीची मोटर सायकल, एक धारदार पाते असलेला अनकुचीदार टोक चाकु. प्लासटिकची काळ्या रंगाची मुठ असलेला रक्ताने माखलेला आरोपीताने गुन्हयात वापरलेला. तसेच (निळ्या रंगाचा मोबाईल मयत प्रकाश चौधरी याचा)असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.