Home क्राईम धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू

धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू

0
31


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन पटना (बिहार) येथील एका ३६ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३८९ / २५ नजीक कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन रामा जोगेंद्र पंडित (वय – ३६) रा. अजनोरा, ता. नुरसराय, जि. नालंदा (बिहार) या इसमाचा ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान मयत रामा पंडित यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्यानंतर नातेवाईक पाचोरा येथे दाखल होवुन रामा पंडित यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल सचिन पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound