आडगाव येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव पाठोपाठ आडगाव येथे एका शेतमजुरी करणाऱ्या तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, आज आडगाव तालुका यावल येथील रहीवासी अजय उर्फ भिमा उत्तम इंधाटे वय२२ वर्ष या शेतमजुरी करणाऱ्या तरूणाने त्याची आई गावाला गेली असता सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या लोखंडी हेंगलला दोरी बांधुन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत धनराज गोंविंद बागुल (वय३०वर्ष राहणार कळमगाव तालुका चोपडा) यांनी पोलीसात याप्रकरणी माहिती दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख हे करीत आहे.

मयत अजय इंधाटे याच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी शवविच्छेदन केले. तरूणाच्या आत्महत्याचे कारण मात्र स्पष्ट होवु शकले नाहीत. दरम्यान आजच आडगावच्या शेजारचे गाव किनगाव येथे ही एका अविवाहीत तरूणाने आत्मह्त्या केल्याची घटना घडली असुन परिसरात एकाच दिवसी दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटने बाबत परिसरात ग्रामस्थ हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Protected Content