फैजपुर येथे गणपती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

फैजपुर  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी |  दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी, फैजपूरमध्ये गणपती महोत्सवानिमित्त सामाजिक संहिष्णुता स्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.

 

सदरील कार्यक्रमास सकाळी आचार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते श्रींच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते.  नंतर कॉलेज विद्यार्थ्यांकडून शीरखुर्मा पार्टीचे तसेच प्रश्नमंजुषा कार्यक्रम, भावगीत गायन, दांडिया अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  सदरील कार्यक्रमामधून उत्कृष्ट कलागुण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष  आ.  शिरीष चौधरी, धनंजय चौधरी,  पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, नगरपालिका मुख्याधिकारी वैभव लोढे या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, नगरसेवक केतन किरंगे, कुरबान शेख जफर, मेहबूब पिंजारी इरफान, शेख रियाज भाई, कलीम खान फिरोज खान तसेच  महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. तसेच सदर कार्यक्रमाची माहीती कॉलेजमधील प्राध्यापिका निलम शशिकांत पाटील  यांनी दिली. सूत्रसंचालन कॉलेज मधील चतुर्थ वर्षांमधील विद्यार्थिनी पठाण महेक फिरोज खान हिने  केले. आभार शेख नबिल मतीन या विद्यार्थ्याने मानले.  कार्यक्रमास कॉलेज प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Protected Content