विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत ऑनलाईन विज्ञान सप्ताहाचे आयोजन

 

जळगाव, प्रतिनिधी ।  विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर येथे विज्ञान सप्ताहाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यात प्राचार्य उमेश इंगळे यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. 

विज्ञान सप्ताहा अंतर्गत पहिल्या दिवशी विज्ञान खेळणी यांचे सादरीकरण दिपाली सहजे यांनी केले. यात भिंगरी, स्प्रिंकलर, स्ट्राँ पासुन डीएनए, माऊथ आँर्गन बनवून दाखविले. दुसऱ्या दिवशी  विज्ञान आणि आरोग्य याविषयी सचिन गायकवाड माहिती दिली व विज्ञान प्रश्न मंजुषा, वैष्णवी शिंपी यांनी घेतली. तिसऱ्या दिवशी  अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर प्रात्यक्षिकासह आँनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. विवेकानंद प्रतिष्ठान ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. उमेश आर. इंगळे यांनी मराठी विज्ञान परिषद अंतर्गत समाजातील भोंदूगिरी आणि त्यामागील विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. इंगळे हे  गेल्या अनेक वर्षापासून विज्ञान प्रसाराचे कार्य सोप्या भाषेतून लोकांना कळण्यासाठी अशा प्रकारच्या वेगळ्या प्रयोग कार्यशाळा घेत असतात. आजच्या कार्यशाळेत  ग्लिसरीन आणि पोटॅशियम परमॅग्नेटपासून अग्नी प्रज्वलित करणे, मिथिल ऑरेंज आणि सायट्रिक ऍसिड याने लिंबू आतून लाल होणे, कॅल्शियम कार्बाईड आणि पाणी यांच्या अभीक्रियेतून दिवा पेटवून दाखवणे. चुनकळी आणि मिथील ऑरेंज यांच्या मदतीने हात लाल करून दाखवणे. सॅकरीन पाण्यात मिसळून मंत्राचे पाणी पाजवणे यासारखे अनेक प्रयोग बुवाबाजीच्या नावानं जे समाजामध्ये चालतात या सगळ्यामागे विज्ञान असते हे सरांनी प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन दिपाली सहजे यांनी केले.  कार्यशाळेला शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका वैशाली पाटील, सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते .तसेच स्वंयपाक घरातील विज्ञान याविषयी वैशाली पाटील यांनी माहिती दिली. तसेच आँनलाईन शिक्षण विरुद्ध प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण याविषयी वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. सप्ताह अंतर्गत विज्ञान रांगोळी आणि विज्ञान माँडेल्स स्पर्धा घेण्यात आल्या. संपूर्ण कार्यक्रमाला मुख्याध्यापक  हेमराज पाटील, वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण नियोजन विज्ञान शिक्षिका दिपाली सहजे यांनी केले. 

Protected Content