पद्मालय गणपती मंदीर देवस्थान समितीतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पद्यालय गणपती देवस्थानाला तीर्थस्थळाचा ब दर्जा मिळवून दिल्याबद्दल देवस्थानक समितीतर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

पद्मालय येथील गणपती मंदीर देवस्थानास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्तसाठी राज्यस्तरीय समितीची मान्यता मिळाली आहे. मंजुरी मिळताच येथील देवस्थानचे पदाधिकारी व विश्वस्त यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाळा श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी विश्वस्त अशोक पाटील, डॉ.पिंगळे , कोळी भाऊसाहेब उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित राज्यस्तरीय समितीकडे पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा करून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली होती.त्यानुसार पद्मालय येथील गणपती मंदीर देवस्थानास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्तसाठी राज्यस्तरीय समितीची मान्यता मिळाली आहे. मंजुरी मिळताच येथील देवस्थानचे पदाधिकारी व विश्वस्त यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला.

श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी (अमोद आणि प्रमोद) विराजमान आहेत. खान्देशासह महाराष्ट्राभरातून भाविकभक्त याठिकाणी श्रद्धेने येत असतात. शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत जिल्ह्याच्यादृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या पद्मालय देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जा द्यावा यासाठी भाविकांसह परिसरातील नागरीकांची मागणी होती. त्याची दाखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या १-२ वर्षांपासून सतत पाठपुरावा केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून राज्यस्तरीय बैठकीत प्रस्ताव मजूर करण्याचे साकडे घातले होते.

दरम्यान, वनक्षेत्रात पर्यटन स्थळांचा विकास (राज्य योजना) योजनेतर्गत जळगाव वनविभागा अंतर्गत एरंडोल वनपरिक्षेत्रातील श्री. क्षेत्र पद्मालय परिसरात पद्मालय वन उद्यान कामाचा कृती आराखडा शासनाच्या वन विभागाकडून लवकरच मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे. पद्मालय देवस्थानास तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा मिळाला असून आता लक्ष्य पद्मालय वन उद्यान मंजुरीचे असून त्यासाठी लागणार १० कोटी ९३ लक्ष निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आ.चिमणराव पाटील यांचे सहकार्य घेऊन मंजूर करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Protected Content