अत्तरदेंसारखा भूमिपुत्रच आमदार व्हावा : कंडारी ग्रामस्थांच्या शुभेच्छा

kandari daura

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज (दि.१०) दुपारी ४.०० च्या सुमारास कंडारी येथे प्रचार दौरा केला. अत्तरदे यांच्यासारखा भूमिपुत्र नेताच आमदार व्हावा, असा सूर गटामधील जनतेतून उमटला, तशा शुभेच्छाही त्यांना देण्यात आल्या.

 

यावेळी गावातील महिलांनी त्यांचे व त्यांच्या पत्नी सौ.माधुरीताई यांचे उत्साहात स्वागत केले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत जयवंतराव अमृतराव पाटील, शशांक पाटील, विजय परदेशी, संजय भोळे, गणेश पाटील, प्रकाश बारी, सुदाम राजपूत, अरुण सपकाळे, मिलिंद चौधरी, अरुण बर्हाटे, ईश्वर मराठे, मनोज इंगळे, दीपक ढाके, नकुल चौधरी, दिगंबर खाचणे, सुनिल अत्तरदे, कंडारी गावचे सरपंच, ग्रा.पं. सदस्य, राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्यासह बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पेज प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content