फैजपूर येथे दुर्गा विसर्जन उत्साहात (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 10 at 6.41.58 PM

 

फैजपूर,प्रतिनिधी | शहरातील दुर्गा उत्सव मंडळांच्या मिरवणुकीला सुभाष चौकातून दुपारी ३ वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत एकूण १६ दुर्गोत्सव मंडळांचा सहभाग होता.

शहरातील दुर्गाउत्सव ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. यावेळी प्रत्येक मंडळांना फैजपूर पोलिस स्टेशनचे एपीआय प्रकाश वानखडे यांनी विसर्जन मिरवणुकीच्या २ दिवस आधी मंडळांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून चिठ्ठ्या काढून नंबर वाटप करण्यात आले. यामुळे या मिरवणुकीत एक चांगली शिस्त लावण्याचे काम एपीआय प्रकाश वानखडे यांनी केले. दुपारी ३ वाजता सुभाष चौक येथे प्रत्येक मंडळाला मिळालेल्या नंबरानुसार मिरवणूकीत सहभाग घेत होते. सुभाष चौक, खुशाल भाऊ रोड, जुने हायस्कुल, राथगल्ली, होते वाडा, लक्कड पेठ, मोठे मारोती व सुभाष चौक येथे मिरवणूक काढण्यात आली . मिरवसणुकीत पारंपरिक वाद्य, बँड, ढोलताशे इत्यादी वाद्यांचा सहभाग होता. यावेळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखडे व पोलीस सहकाऱ्यांनी चौक बंदोबस ठेवला होता.

Protected Content