भाजप उमेदवार मंगेश चव्हाण यांचा उद्या कोदगाव येथून प्रचार रॅली

mangesh chavhan

चाळीसगाव, प्रतिनिधी | भाजपा – शिवसेना – रिपाई – रासप महायुतीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांच्या प्रचार रॅलीस  उद्या शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता कोदगाव येथून शुभारंभ करण्यात येणार आहे.

खासदार उन्मेष पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, जि. प. सभापती पोपट भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, पं स सभापती स्मितल बोरसे,
उपसभापती संजू पाटील उपस्थित राहणार आहेत.   विधानसभा प्रचार दौरा प्रमुख दिनेशभाऊ बोरसे , जि. प. सदस्या मंगला जाधव, तालुका सरचिटणीस तथा गट प्रमुख धनंजय मांडोळे, पं. स. सदस्य सुनील पाटील, पं.स.सदस्य वंदना मोरे,  माजी पं. स. सदस्य जगन्नाथ महाजन,  माजी जि.प.सदस्य शेषराव पाटील, माजी पं. स. उपसभापती बाळासाहेब राऊत , मार्केट संचालक मच्छिंद्र राठोड,  मार्केट संचालक किशोर पाटील,  तालुका चिटणीस तथा गणप्रमुख डॉ.रविंद्र मराठे, दिनकर राठोड , उमेश आव्हाड तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव ग्रामीण झंझावाती प्रचार दौरा काढण्यात येणार आहे. कोदगाव नंतर सकाळी ९.३० वाजता – बेलदारवाडी, सकाळी १० वाजता – गणपूर गाव व तांडा , सकाळी १०.३० वाजता – शामवाडी, सकाळी ११ वाजता – चितेगाव, सकाळी ११.३० वाजता – पिंप्री बु प्रचा, दुपारी १२ वाजता – गणेशपुर, दुपारी १२.३० वाजता – शिंदी दूपारी १ वाजता ओढरे / विष्णूनगर , दुपारी २ वाजता – खडकी बु., दुपारी ३.३० वाजता – तांबोळे बु व खु , संध्याकाळी ४.३० वाजता – खरजई, दुपारी ५.३० वाजता – तरवाडे, रात्री.६.३०वाजता – बहाळ येथे गट मेळावा घेण्यात येणार आहे. गावातील, गणातील, गटातील समस्त गट प्रमुख, गण प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेरमन ,संचालक नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व तालुक्यातील तालुका व जिल्हा युवामोर्चा, महीला आघाडी, सर्व पदाधिकारी तसेच आपले मित्र पक्ष शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रासप,शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी यांनी मंगेश चव्हाण यांच्या दौऱ्यात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content