अत्तरदेंसारखा शेतकऱ्यांमधील नेता हवा ; ग्रामस्थांच्या भावनिक प्रतिक्रिया

08c1b8b5 9cd8 4eff 88ac 04a7ca6c0798

 

जळगाव (प्रतिनिधी) अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा आज उमाळे येथील प्रचार दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अत्तरदे यांच्यासारखा शेतकऱ्यांमधील नेता हवा, अशा भावनिक प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

 

उमाळे येथील प्रचार दौऱ्यावेळी गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरीताई अत्तरदे यांचे फुलहार घालून स्वागत केले. सदर प्रसंगी प्रकाश बारी, रघुनाथ चव्हाण, शरद पाटील, जयवंतराव अमृतराव पाटील, शशांक पाटील, विजय परदेशी, संजय भोळे, गणेश पाटील, प्रकाश बारी, सुदाम राजपूत, अरुण सपकाळे, मिलिंद चौधरी, अरुण बर्हाटे, ईश्वर मराठे, मनोज इंगळे, दीपक ढाके, नकुल चौधरी, दिगंबर खाचणे, सुनिल अत्तरदे, उमाळे गावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content