सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्याच दिल्या – जयंत पाटील

jayant patil 1

जामनेर प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आर्थिक अडचणीने त्रासलेल्या शेतकरी राजाला कर्जबाजारीतून सरसकट कर्जमाफी देवून सुटका देण्याऐवजी आत्महत्याच दिल्या आहेत. असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे जंयत पाटील यांनी जामनेर येथे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार संजय गरूड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केला आहे.

आज राज्यातील जनतेच्या मनात फडणवीस सरकारविषयी रोष असून सर्वसामान्य माणसच जगणं कठीण झाले आहे. या सरकार जवळ आता जनतेला द्यायला उत्तर नाही. विरोधक बोलायला लागले तर त्यांच्या ईडी, सीबीआयकडून चौकशी करण्यास सांगितले जाते. आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत असते. यावेळी सरकार हे विसरत आहे की, लोकशाहीत पण विरोधकांचा आदर करावा लागतो. परंतू दिल्लीतील भाजपाचे कार्यालय कार्पोरेट असल्याचे ऐकायला मिळत. मात्र यांच्याकडे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला पैसे नाहीत. देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी त्यावेळेस शेतमालाला आधारभूत किंमती देवून, सर्व सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले. तर दुसरीकडे मोदी सरकारने नोटबंदी करून देशाला फार मोठ्या संकटात ढकलले आहे. यामुळे कोटींच्या घरात लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. असे यावेळी जयंत पाटील बोलते होते. तसेच अमोल मिटकरी यांनीही आपल्या भाषणात भाजपा सरकारची कार्यपद्धती मांडली. यावेळी मंचावर अमोल मिटकरी, रवींद्र पाटील, गफ्फार मलीक, डिंगबर पाटील, संजय गरूड, अँड.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content