ग. स. मधील प्रस्थापितांना टक्कर देणार महाविकास गट ! ( व्हिडीओ ) (G. S. Society Jalgaon Election)

Jalgaon जळगाव सचिन गोसावी । सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून यात महाविकास गट स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून उतरणार असल्याची माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली. आजवर तेच-ते संचालक निवडून येत असून यात संस्थेचे कोणतेही हित झाले नाही. यामुळे प्रस्थापितांना सक्षम पर्याय म्हणून हा गट कार्य करणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वीच ग.स. सोसायटीतील सत्ताधारी गटात फुट पडल्याने संस्थेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. तसेच यानंतर राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय जाहीर केला आहे. अर्थात, यात जळगाव जिल्हा ग.स. सोसायटीतही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने आता निवडणुकीच्या घडामोडी वेगाने होऊ लागल्या आहेत. यात आज शहरात महाविकास गटातर्फे निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

या बैठकीतील चर्चेत आगामी निवडणुकीत सर्वसमावेशक महाविकास गट स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून लढणार असल्याचे निश्‍चीत करण्यात आले. १११ वर्षांची परंपरा असणारी, तब्बल ४० हजार सदस्य असणारी व आशिया खंडात नावलौकीक असणार्‍या ग.स. मध्ये अलीकडच्या १५-२० वर्षात तीच-ती मंडळी वेगवेगळ्या पॅनलच्या नावाखाली सत्ता भोगत असून सदस्यांना मात्र याचा काडीचाही लाभ झालेला नाही. या बाबींचा विचार करता, सभासदांच्या हितासाठी महाविकास गट निवडणुकीत उतरणार असल्याचा निर्णय याप्रसंगी घेण्यात आला. हा गट अन्य कोणत्याही गटासोबत जाणार नसल्याचेही याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले. लवकरच याबाबत प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्यात येणार असल्याची घोषणा याप्रसंगी महाविकास गटाचे नेते नाना पाटील यांनी केली.

याप्रसंगी ईश्‍वर सपकाळे, नाना पाटील, संदीप पवार, राधेश्याम पाटील, नरेंद्र सपकाळे, राजेश जाधव, रमेश बोरसे (धरणगाव); संदीप पाटील (यावल), सचिन सरकटे (एरंडोल), अनिल चौधरी (पारोळा), चंद्रशेखर साळुंखे (चोपडा), नंदू पाटील ( पारोळा) यांची उपस्थिती होती. G. S. Society Jalgaon Election, G. S. Society Jalgaon, jalgaon

खालील व्हिडीओत पहा महाविकास गटाच्या पदाधिकार्‍यांनी नेमके काय म्हटले ते ?

https://www.facebook.com/508992935887325/videos/126354629359063

Protected Content