Home आरोग्य सार्वजनिक विद्यालय असोदा येथे जागतिक योग दिन साजरा

सार्वजनिक विद्यालय असोदा येथे जागतिक योग दिन साजरा

0
106
ba884f69 64a6 41bf 8c99 949e0dc22c3f
ba884f69 64a6 41bf 8c99 949e0dc22c3f


ba884f69 64a6 41bf 8c99 949e0dc22c3f
 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधत सकाळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी योगासने व प्राणायम केले.

विद्यालयातील क्रीडा शिक्षक व योगशिक्षक डी. जी.महाजन यांनी “योग” व दैनंदिन जीवनातील महत्त्व याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर सर्वांचा पूरक व्यायाम घेऊन महाजन सरांनी आसनांचे व प्राणायामाचे प्रात्यक्षिक घेतले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आचारणाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound