जामनेरात आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात

WhatsApp Image 2019 06 22 at 6.37.59 PM

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यासह शहरामध्ये आंतरराष्ट्रीय “योगदिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. योगदिनाच्या निमीत्ताने शाळा,महाविद्यालये, शासकीय आस्थापने,राजकीय,सामाजीक संघटनांचा मोठा सहभाग दिसुन आला.

शहरातील हिवरखेडा रोडवरील पांडुरंग-गोवींद महाराज संस्थानच्या विस्तीर्ण मैदानावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांचे असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. विवीध राजकीय पक्षांचे पदाधीकारी,कार्यकर्ते, सामाजीक संघटना, शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका,शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर, वकील, इंजिनीअर, व्यापारी, दुकानदार आदी पहाटेपासुनच मैदानावर येण्यास सुरूवात झाली होती. यावेळी महीला व मुलींची संख्या लक्षणीय होती.

Protected Content