मोठी बातमी : पाकला गुप्त माहिती पुरवली; जळगावकर तरूणाला अटक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नौदलात काम करतांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवण्याच्या आरोपावरून एकाला अटक करण्यात आली असून जळगावातील रहिवासी आहे.

पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आज धडक कारवाई केली. या तरूणाने नोवल डॉकमध्ये कार्यरत असतांना ही गद्दारी केली आहे. एप्रिल-मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सऍप वर तो संपर्कात होता. एटीएसने चौकशी केल्यानंतर चौघांना अटक केली आहे. गौरव पाटील याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला हनी ट्रॅप अडकवल्याचा संशय आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातून एकाला अटक केली आहे. त्याने नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव गौरव पाटील असे आहे. २३ वर्षीय गौरव पाटील नोवल डॉक येथे कामाला होता. गौरव मागील चार ते पाच महिन्यांपासून पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून संपर्कात होता. त्याने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचेही एटीएसला आढळून आले आहे.

या प्रकरणी अजून तीन जणांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. यामुळे एटीएसने गौरव पाटील याच्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, या प्रकरणात गौरव पाटलासह इतरांना हनी ट्रॅपमध्ये अडकावून त्यांच्याकडून पाकच्या गुप्तचर यंत्रणेने माहिती मिळवल्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली असून या दिशेने चौकशी सुरू आहे.

दरम्यान, गौरव पाटील हा मूळचा जळगाव येथील रहिवासी असून त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content