रेकॉर्डवरील गुन्हेगाराला नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. याबाबतचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले आहे.

ललित उमाकांत दीक्षित (वय २४, ईश्वर कॉलनी, जळगाव) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत ८ गुन्हे दाखल असून ४ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. “धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत प्रस्ताव हा एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा एलसीबी येथे सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर  जिल्हाधिकारी यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार १२ डिसेंबर रोजी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील स्थानबध्द आदेश पारीत केला आहे.

एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि. दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोना सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी अशांनी स्थानबध्द इसमास  ताब्यात घेवून मध्यवर्ती कारागृह, नागपूर  येथे दाखल करण्यात आले आहे. वरील एमपीडीए प्रस्ताव हे  एम.राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व त्यांचे अधिनस्त सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ ईश्वर पाटील अशांनी काम पाहिले आहे.

Protected Content