जोशीपेठेतून लांबविली एकाची दुचाकी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जोशी पेठ येथून तरूणाच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोहम्मद इस्त्राईल मोहम्मद मुस्ताक तांबोळी (वय-३३) रा. बागवान मोहल्‍ला, जोशी पेठ हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मेडिकलच्या दुकान चालूवन आपल्या कुटूंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीपी ६३९५) क्रमांकाची मोटरसायकल आहे. १४ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे दिवसभर काम करून सायंकाळी ११.३० वाजता घरी आले व त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरुन नेल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आला.

या संदर्भात त्यांनी परिसरात दुचाकीच्या शोधात शोध घेतला असता मोटरसायकल मिळून आले नाही. दरम्यान शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे करीत आहे.

 

Protected Content