Home क्राईम दिशा व सुशांतची आत्महत्या नव्हे तर हत्याच ! : राणेंचा सनसनाटी आरोप

दिशा व सुशांतची आत्महत्या नव्हे तर हत्याच ! : राणेंचा सनसनाटी आरोप

0
38

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिशा सलियन आणि सुशांतसिंह राजपूत यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा सनसनाटी आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करतांना काही धक्कादायक दावे देखील केलेत.  याबाबत नारायण राणे म्हणाले की, ’दिशा सलियनवर बलात्कार होत असताना त्या फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत होते ? ८ जूनला दिशा सलियनची हत्या झाली होती. जेव्हा सुशांतला या सर्व प्रकरणाविषयी कळले तेव्हा त्यानं आवाज उठवण्याचं ठरवलं. पण म्हणूनच त्याचीही हत्या करून त्याला शांत करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी दिशा सलियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाविषयी आणखी नवे खुलासे केले.

दिशा सलियन मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांकडून बंद करण्यात आल्यामुळे आता नारायण राणे यांनी थेट ठाकरे सरकारला आव्हान देत म्हटलं आहे की,’’आम्ही ही केस पुन्हा उभी करू,कोर्टात न्याय मागू पण शांत बसणार नाही. ठाकरे सरकारला दिशा सलियन,सुशांत सिंह राजपुत संदर्भातल्या अनेत अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावेच लागेल’’, असंही केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

 

 

 


Protected Content

Play sound