जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत मनसेने जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा दिलेला नाहीय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांमधुन मोदी व शहा यांना विरोध करीत आहे. कोणाला निवडुन द्या, असा उल्लेख त्यांच्या भाषणात कोठेही नाही. म्हणून जळगाव जिल्ह्यामधील मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने अथवा कार्यकर्त्याने कोणत्याही उमेदवाराचा खुला किंवा छुपा प्रचार करून नये, अन्यथा पक्षाअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे. दरम्यान उद्या दुपारी 2 वाजता पक्षाचे नेते ॲड. जयप्रकाश बावीस्कर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यामधील आजी माजी पदाधिकारी यांची बैठक जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
पक्षाच्या आज जळगाव येथे झालेल्या बैठकीत माजी जिल्हा संघटक राजेंद्र पाटील, जिल्हा सचिव ॲड. जमील देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. कैलास लोखंडे, उपजिल्हाध्यक्ष अनिल वाघ, अतुल नेमाडे, संजय पाटील ( ता. अध्यक्ष पाचोरा ) विलास राजपुत ( जामनेर ), विक्रमसिंग पाटील ( बोदवड), राजेश सांगोळकर ( मुक्ताईनगर ) प्रविण पाटील ( पारोळा), मुकुंदा रोटे जळगाव ग्रामीण, डॉ. उमेश सपकाळे भुसावळ, ॲड. मिलींद पाटील रावेर, संजय नन्नवरे ( यावल ) भुषण आर्या ( चाळीसगाव ), ॲड. विलास बडगुजर ( चाळीसगाव ) सचिन पाटील (चोपडा ), विनोद पाठक (भुसावळ) विनोद शिंदे ( विद्यार्थी सेना ), अशोक पाटील विद्यार्थी सेना, ललीत पाटील (धरणगाव), संदीप मांडोळे, अविनाश पाटील, संदीप पाटील, संदीप चौधरी ( कासोदा ), रज्जाक सैय्यद, जळगाव आदी उपस्थित होते.