धरणगाव प्रतिनिधी । व्यवहारासाठी नेहमी रक्कम आवश्यक असते सदर रक्कम खिशात बाळगण्यापेक्षा बँक खात्यातून ए.टी. एम.मधून आवश्यकतेनुसार काढणे कधीही सोयीचे ठरते पण लग्नसराई व सणासुधीच्या दिवसात धरणगाव स्टेट बँक शाखेस लागून असलेले ए.टी.एम.मध्ये मात्र कायम ठणठणात असल्याचे दिसून येते.
याबाबत शाखा प्रबंधला विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ग्राहक निराश होत आहेत. काही वेळेस कार्यालयीन वेळेत मशीन सुरू असते, मात्र शाखा बंद झाली तेव्हा मशीन देखील बंद असते. दरम्यान बँकेकडून नवीन ए.टी.एम.कार्ड वितरीत करण्यात आलेले आहेत मात्र गुप्त पिनकोड जनरेट करण्यासाठी देखील ए.टी.एम. मशीनची आवश्यकता असते. अशा पध्दतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.