दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं ; साध्वी प्रज्ञा

download 8

भोपाळ (वृतसेवा)  मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं संतापजनक  वक्तव्य साध्वी प्रज्ञाने केलं आहे. भोपाळ लोकसभेची भाजपची उमेदवार असलेली साध्वी प्रज्ञा सिंहच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात रोष पहावयास मिळत आहे.

 

एका जाहीर सभेत साध्वी म्हणाली, “तपास अधिकारी सुरक्षा समितीचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरेंना बोलवून मला सोडण्यास सांगितलं होतं. मात्र हेमंत करकरेंनी नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असं म्हटलं होतं”  साध्वी प्रज्ञाने शहीद हेमंत करकरेंची तुलना कंसाशी केली. कंसाचा वध जसा श्रीकृष्णाने केला, तसंच देवाने वध केला, असं साध्वी म्हणाली. भगवान राम कालात रावण झाला, त्याचा अंत संन्यासांद्वारे झाला. द्वापारयुगात कंस झाला तेव्हा त्याचा अंत करण्यासाठी श्रीकृष्ण आला, असं साध्वी बरळली. हेमंत करकरे हे दहशतवादविरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी होते. मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले होते. याशिवाय हेमंत करकरे मालेगाव साखळी बॉम्ब स्फोटाचे तपास अधिकारी होते. याच खटल्यात साध्वी प्रज्ञा आरोपी होती.

Add Comment

Protected Content