अमळनेर नगरपरिषेदला आयएसओ मानांकन मिळाल्याने शरद पवार यांच्याहस्ते मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राज्यातील पहिल्या  ISO ९००१:२०१५ मानांकन प्राप्त करणाऱ्या अमळनेर नगरपरिषदेला मिळाला आहे. या अनुषंगाने  राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या हस्ते  नगरपरिषेदचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

 

ISO  (International Organization for Standardization) – ही एक स्वतंत्र, गैर-सरकारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी आवश्यकता खालील निर्दिष्ट करते जेव्हा एखादी संस्था पूर्ण करते तेव्हा ISO ९००१:२०१५ मानाकंन प्राप्त होते.

१. Good Governance- सुशासन

२. Quality Management – गुणवत्ता व्यवस्थापन

३. Health – आरोग्य

४. Water, sanitation

५. Water Conservation – पाणी संवर्धन मूलभूत

६. Energy Efficient- उर्जा कार्यक्षमता

 

 

यासर्व बाबींची पूर्तता केल्यास ISO संस्थे कडून सदरचे मानांकन प्रदान करण्यात येते

यासंबंधी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी  सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेऊन याबाबत पूर्तता करण्यासाठी आवाहन केले व वेळोवेळी त्याचा आढावा घेतला आपल्या कार्यालयातील काही त्रुटींची पूर्तता केली आणि सर्व विभाग प्रमुख यांनी आपापल्या विभागाचे काम अत्यंत चोखपणे बजावले त्या कारणाने हे मानांकन नुकतेच प्राप्त झाले व अमळनेर नगरपरिषद ISO ९००१:२०१५ मानांकन प्राप्त करणारी राज्यातील पहिली नगरपरिषद ठरली आहे.

 

हा पुरस्कार  खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याहस्ते मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत सरोदे यांचे सह अभियंता डीगंबर वाघ , प्रशासन अधिकारी संजय चौधरी,वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन यांना देण्यात आला.

Protected Content