पहूर पेठ विकासो चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पहुर पेठ विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे साहेबराव देशमुख यांची चेअरमनपदी बिनविरोध तर व्हाईस  चेअरमनपदी रवींद्र बारी यांची निवड बिनविरोध करण्यात  आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सहकार विकास पॅनल तर विरोधात भाजपा प्रणीत शेतकरी विकास पॅनल अशा दोन पॅनलमध्ये काट्याची लढत होऊन यात शेतकरी विकास पॅनल 13 पैकी 10 जागेवर स्पष्ट बहुमत मिळाल्याने आज सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डी. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची बैठक होऊन या बैठकीत शेतकरी विकास पॅनलचे साहेबराव देशमुख यांची चेअरमनपदी बिनविरोध तर व्हाईस  चेअरमनपदी रवींद्र बारी यांची निवड बिनविरोध करण्यात  आहे.

याप्रसंगी साहेबराव देशमुख व रवींद्र बारी या दोघांचे संस्थेच्या वतीने संचालकांच्या वतीने हार-गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे, ललित लोढा, आर. टी. लेले हायस्कूलचे  मुख्याध्यापक आर.बी.पाटील, नवनिर्वाचित संचालक अभय पांढरे, राजेश लोढा, संध्या पाटील, सुशिलाबाई देशमुख, किरण खैरनार, शामराव  सावळे, भास्कर पाटील, अरुण घोलप, गोकुळ कुमावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख संस्थेचे सचिव विश्वनाथ सावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content