उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नियमित वेतन आणि विमा योजनांचा लाभ देण्यात यावा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी ९ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशाासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने शासनाच्या दरबारी संघटनेच्या वतीने संविधानात्मक पध्दतीने पाठपुराव करत आलेले आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेकदा संबंधित शिक्षण विभागातील कार्यालयामध्ये अनेकवेळा बैठका घेण्यात आला, चर्चा करण्यात आली, निवेदन देखील देण्यात आले. परंतू प्रशासनाकडून गांभिर्याने लक्ष दिलेले नाही, त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत करण्यात यावे, थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, कर्मचाऱ्याना विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अंशत अनुदानित तत्वावरील शिक्षकांना सेवासंरक्षण लागू करावा, थकीत वेतनाचा फरक देण्यात यावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिपक कुळकर्णी, सचिव प्रा. अनिल परदेशी, कार्याध्यक्ष प्रा. संतोष वाघ, उपाध्यक्ष प्रा. राहूल कांबळे, कोषाध्यक्ष प्रा. प्रशांत कवर, गणेश ढोरे, निलेश पाटील, गंगाधर पडणुरे यांच्यासह  उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content