राजोरा येथील गटारींचे काम पुर्ण : ग्रामस्थांकडून कौतुक

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील राजोरा येथे भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याने पंचायत समितीच्या शिल्लक निधीतून बंद गटारीचे काम पूर्ण करण्यात आले असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

राजोरा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील या गटारीच्या कामाकरीता भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी यांच्याकडून यावल पंचायत समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता व आता प्रत्येक्षात हे काम पुर्ण झाल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केल जात आहे.

राजोरा ता. यावल येथे गावात बंदिस्त गटारी करीता पंचायत समिती कडून शेष फंडाचा निधी मिळावा म्हणुन पंचायत समितीच्या मावळत्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे यांच्या कडे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी यांनी पाठपुरावा केला होता. या गणातील पंचायत समितीच्या सदस्या या अपात्र झाल्याने गणातील विविध विकास कामांकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने अखेर या भागातील गावांना विकास कामांकरीता निधी उपलब्ध व्हावा म्हणुन भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी हे सातत्याने पाठपुरावा करत होते.

दरम्यान त्यांच्या पाठपुराव्यामुळे राजोरा गावात ३०० फुट लांबीची बंदिस्त गटारी करीता पंचायत समितीच्या शेष फंडातुन निधी उपलब्ध् झाला व गावात काम पुर्ण करण्यात आले. या कामाकरीता राजोरा येथील भाजपा पदाधिकारी मधूकर नारखेडे, उल्हास पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा महाजन, कल्पेश पाटील, चेतन पाटील, मयुर महाजन यांना प्रस्ताव मांडला होता व तालुक्यावर सागर कोळी यांनी पाठपुरावा केला. तेव्हा गावातील गटारीचा खुप दिवसांपासुन प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरीकांमधुन पावसाळ्या पुर्वीच या बंदीस्त गटारींचे काम झाल्याने कामाचा पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केला जात आहे.

 

Protected Content