गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे राष्ट्रीय स्तरावरील “ग्लोबल बिजनेस अँन्ड एज्युकेशन अवार्ड”ने सन्मानित

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नवी दिल्‍ली येथे नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्लोबल बिजनेस अँन्ड एज्युके शन अवार्डने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा पियुष वाघ यांनी हा पुरस्कार स्विकारला.

२०२३ वर्षातील सर्वात उदयोन्मुख उच्च संस्था म्हणून संपुर्ण भारतातून नर्सिंग महाविद्यालयापैकी एकमेव गोदावरी नर्सिग महाविद्यालयाचे नामांकन निवडले गेले आहे. सुर्वण पदक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. १५ ऑक्टोंबर २३ रोजी झालेल्या या कार्यक्रमाकरीता मुख्य अतिथी म्हणून माजी क्रिकेटपटू मदनलाल शर्मा, माजी सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्रीय मंत्री अल्फाँन्स जोसेफ कनंनथनम तसेच छत्‍तीसगडचे माजी राज्यपाल शेखर दत्‍त, युगांडाच्या भारतातील उच्चायुक्‍त जॅकलीन मुकनजिरा, मिशन फाईट बँक संचालक,लेप्ट. कर्नल  रोहीत मिश्रा,व देशभरातील इतर उच्च स्तरीय मान्यवर उपस्थीत होते. राजधानी दिल्‍लीतील हॉटेल विवांता व्दारका या ठीकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा पियुष वाघ यांनी हा पुरस्कार स्विकारला. गुणात्मक डाटाच्या आधारे हे नामांकन करण्यात आले होते. संपुर्ण भारतातील शाळा, महाविद्यालय आणि व्यवसायीक संस्था लाखो नामांकन यासाठी प्राप्त झाले होते.यातील १५० डेटांची निवड करण्यात आली होती यात माहिती प्राप्त गुणवत्‍तेच्या आधारावर  गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगची निवड करण्यात आली. गेल्या २० वर्षापासून जळगाव जिल्हयात शैक्षणिक, सामाजिक, आणि सामुदायीक आरोग्य क्षैत्रात भरीव कामगीरी करत गोदावरी नर्सिंग महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उच्च दर्जा प्राप्त करून देत सेवाव्रती घडवण्याचे कार्य करीत आहे . मुख्य अतिथींनी देखिल आपल्या भाषणातून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या शैक्षणीक, सामाजिक आणि सामुदायीक आरोग्याचे ग्रामीण विभागातील योगदान यामुळेच या सन्मानाचे खरे हकदार असल्याचा उल्‍लेख करत आगामी काळात असेच योगदान गोदावरी नर्सिंग महाविद्यालय देत राहील अशी प्रशंसा करून शुभेच्छा व्यक्‍त केल्यात. या प्राप्त सन्मानातून गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावर नवीन ख्याती प्राप्त झाली आहे.

गोदावरी फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाषदादा पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, हदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, डॉ अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, यांच्यासह गोदावरी परिवाराच्या प्रेरणास्त्रोत श्रीमती गोदावरी पाटील,यांनी आर्शिवाद देत आगामी काळात गोदावरी नर्सिंग हे भारतातील टॉप १० मध्ये यावे अशी इच्छा व्यक्‍त केली. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना वैद्यकिय शिक्षण आणि रूग्णांना निरंतर आरोग्य सेवेचा प्रण संचालक माजी खा.डॉ उल्हास पाटील यांनी हा सन्मान गोदावरी नर्सिंग परिवाराचे पथप्रदर्शक प्रशासकिय अधिकारी प्रविण कोल्हे, प्रो. विशाखा गणवीर यांचेसह महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  तथा सर्व सदस्यांना समर्पित केला.

Protected Content