दसरा दिवाळी सणाच्या काळात अतिक्रमणधारकांवर कारवाई करू नये- आ. चंद्रकांत पाटील

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळातील अतिक्रमण व कर थकबाकीदार गाळेधारकांच्या विरोधात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान दसरा आणि दिवाळी असल्यामुळे ही कारवाई थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने गुरूवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेवून चर्चा केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सावळ शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील वाढलले अतिक्रमणासह थकबाकीदार गाळेधारकांवर प्रांताधिकारी  जितेंद्र पाटील हे स्वत: रस्त्यावर उतरून कारवाई करत आहे. दरम्यान ही कारवाई दसरा व दिवाळी दरम्यान थांबवावी. गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊ नये, त्यांची दिवाळी देखील आनंदात साजरी व्हावी, यासाठी दिवाळीनंतर त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा व ही कारवाई तातडीने थांबविण्यात यावी अशी मागणी  भुसावळकरांकडून केली जात आहे. दरम्यान गुरूवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ येथील प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट घेवून चर्चा केली. यात तुर्तास दसरा व दिवाळी पर्यंत कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी केली आहे. याप्रसंगी  प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी, पीआरपीचे जगन सोनवणे, शिवसेनेचे समाधान महाजन, मनसेचे राहुल सोनटक्के यांच्यासह अतिक्रमणधारक व गाळेधारक उपस्थित होते.

Protected Content