मुंबई प्रतिनिधी । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीची मतदानाला आज सुरूवात झाली आहे. या दिवसाची संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज आतुरतेने वाट पाहत होते. तो लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस अखेर उजाडला असून अनेक राजकीय नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवारांची वाढलेली धाकधूक शिगेला पोहचली असून 3 हजार 237 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंदिस्त होणार आहे.