महाविकास आघाडीच्या बैठकीत बाजार समिती निवडणुकीवर होणार मंथन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे.

पुढील महीन्यात होवु घातलेल्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या राज्यातील महाविकास आघाडीची महत्वपुर्ण बैठक उद्या यावल येथे आयोजीत करण्यात आली आहे.

यावल येथील यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात दिनांक २६ मार्च रविवार रोजी दुपारी तीन वाजता रावेर यावल तालुका विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची बैठक महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना ( ठाकरे गट ) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या महत्वपुर्ण बैठकीला घटक पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे , शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी केले आहे. तर, या बैठकीत नेमकी काय रणनिती ठरणार ? याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

Protected Content