आमदार रोहित पवारांचे तीर्थाटन : हिंदुत्वाच्या प्रतिमेची तयारी ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब तीर्थाटन सुरू केले असून या माध्यमातून ते आपली हिंदुत्वाची प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आता रंगली आहे.

आमदार रोहित पवार हे आपल्या कुटुंबासह उत्तर भारतात तीर्थयात्रेला गेले असून याचे अपडेट ते सोशल मीडियात टाकत आहेत. पंढरपुलातील श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्यांनी तीर्थयात्रा सुरू केली आहे. राजस्थानमध्ये देवदर्शन केल्यानंतर ते आता उत्तरप्रदेशातील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत आहेत. यात त्यांनी वाराणसी येथे भेट देऊन आज ते आयोध्येतील श्रीरामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. याआधी त्यांनी वाराणसी आणि सारनाथ येथे भेटी दिल्यात.

राजकारणात सध्या हिंदुत्व हा मोठा आणि महत्वाचा मुद्दा बनलेला आहे. भाजप, शिवसेना आणि अलीकडच्या काळात मनसेने उघड हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. तर अलीकडे भाजप आणि मनसे शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका करत आहेत. या सर्व गदारोळात आपण हिंदूविरोधी नसल्याची भूमिका आता बहुतांश नेते घेऊ लागले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आमदार रोहित पवार यांनी तीर्थयात्रा सुरू केली असून ते प्रत्येक ठिकाणाची सविस्तर माहिती आपल्या फेसबुक पेजवरून शेअर करत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे मनसे आणि शिवसेना नेत्यांनी आपल्या अयोध्या दौर्‍यांचा गाजावाजा सुरू केला असतांना आमदार रोहित पवार यांनी कोणताही गाजावाजा न करता अयोध्या गाठल्याची बाब देखील लक्षणीय मानली जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: