जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मागील दोन दिवसापासून महामार्ग व शहरातील रस्त्यांच्या डागडूजीचे काम सुरु होते. काल तर खड्ड्यांमुळे एका तरुणाचा जीव गेलाय. अगदी मुख्यमंत्री थोड्याच वेळात जळगावात प्रवेश करण्याची वेळ झालीय. तरी देखील शहरातील मुख्य रस्त्याचे भयान वास्तव ‘जैसे थे’ आहे. म्हणूनच सर्वसामान्य जळगावकरांना उपहासात्मक पद्धतीने मुख्यमंत्री साहब…मुस्कुराइए आप जलगांव में हैं !, असं म्हणावं लागताय.
या संदर्भात अधिक असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पारोळा, अमळनेर आणि थोड्याच वेळात जळगावमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील दोन दिवसापासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. गुरुवारी सौरभ मनवाणी या तरुणाचा खड्डे चुकविताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. अशा गंभीर घटनेनंतर प्रशासन युद्धपातळीवर काम करून साईडपट्ट्या दुरुस्त करेल,असे अपेक्षित होते. परंतू मुख्यमंत्री जळगावात दाखल होण्याची वेळ झालीय. तरी साईडपट्ट्या ‘जैसे थे’ च आहेत. म्हणूनच सर्वसामान्य जळगावकरांना उपहासात्मक पद्धतीने मुख्यमंत्री साहब…मुस्कुराइए आप जलगांव में हैं !, असं म्हणावं लागताय.