‘गोदावरी अभियांत्रिकी’त रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयक्युसीच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानार्तंगत वाहतुक नियमाचे धडे विदयार्थ्यांनी गिरवले.

भारतात दरवर्षी असंख्य अपघात होतात. त्यामध्ये हजारो प्रवासी मृत्युमुखी पडतात. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षितता अभियान हे प्रत्येक वर्षी देशभर राबविण्यात येते.त्या अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयक्यूएसी यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ता श्याम लोही (आरटीओ जळगाव), सचिन राठोड(असिस्टंट आरटीओ इन्स्पेक्टर), गणेश पाटील (असिस्टंट आरटीओ इन्स्पेक्टर) हे उपस्थित होते.

त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा. दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन) व सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्याम लोही यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा या अभियाना अंतर्गत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त कशी बाळगावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आपल्या वाहनाचे आरसे याचे महत्त्व सांगताना सिग्नल चे पालन आणि हेल्मेट चा वापर खूप महत्त्वाचा आहे हे नमूद केले.

त्याचप्रमाणे केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश्य न ठेवता समाज प्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.त्याचप्रमाणे त्यांनी रस्ता सुरक्षा संबंधित विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले आणि अचूक उत्तरे देणार्‍या विद्यार्थ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. किशोर महाजन व प्रा. प्रवीण पाटील यांनी काम पाहिले. त्यांना इतर प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन यंत्र विभागाची विद्यार्थिनी गायत्री माळी हिने केले.

Protected Content