दुचाकी देण्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दादावाडी परिसरात राहणाऱ्या एकाला दुचाकी देण्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या शोरूम मालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शहर पोलिसांनी शोरूम मालकासह दोन जणांना शनिवारी 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता यांना अटक केली आहे. शो-रुमच्या मालक गिरीश चौधरी, सुमित सपकाळे व दीपक कोळी अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील खोटे नगरात राहणारे चंद्रकांत सदाशिव इसे हे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांची पत्नी या राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल अगारात आगार व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. सन २०२२ मध्ये दीपक उर्फ मनोज हिरालाल कोळी रा. कांचननगर याने इसे यांच्या पत्नीला कमी किंमतीमध्ये दुचाकी पाहिजे का अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी होकार दिल्यानंतर दीपक कोळी याने इसे दाम्पत्याची त्याचा मित्र सुमित राजू सपकाळे रा. पांझरापोळ टाकी याच्याशी भेट घालून दिले. त्यानंतर दादावाडी परिसरात असलेल्या दत्त शो-रुमच्या मालकासोबत टायअप असून दुचाकी खरेदी करतांना जीएसटी लागणार नाही. त्यामुळे बाजार भावापेक्षा दहा ते बारा हजार रुपये कमी किंमतीमध्ये नवीन दुचाकी मिळवून देतो असे सांगत नागरिकांकडून पैसे घेतले आहे. त्यांना नवीकोरी दुचाकी देखील मिळवून दिली. काही दिवस दुचाकी वापरल्यानंतर तुम्हाला तुमची गाडी आरटीओ पासिंग करुन देतो असे सांगत पुन्हा घेवून गेले. मात्र ती दुचाकी देखील अद्यापपर्यंत त्यांच्या ताब्यात दिलेली नसून त्यांची फसवणुक केल्याचे उघड झाले.

 

पासिंगच्या नावाखाली घेवून जात होते वाहने

सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत इसे यांनी वेळोवेळी दुचाकी खरेदी करुन देणारे सुमित सपकाळे व दीपक कोळी यांच्यासह दत्त शो-रुमचे मालक गिरीश चौधरी खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आहे. या तिघांची फसवणुक करणारी टोळी आले. तसेच शो- रुमचा मालक गिरीश चौधरी हा विनापासिंग झालेल्या गाड्या दोघांना देतो, ती वाहने हे दोघे नागरिकांना कमी किंमतीमध्ये विक्री करतात. त्यानंतर त्या वाहनांची पासिंग करुन देतो असे सांगत ती वाहने पुन्हा आपल्या ताब्यात घेवून नागरिकांना गंडवित असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहेत.

Protected Content