बुलढाण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी 

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात वाढत्या अवैध धंद्यामुळे दादागिरीचा जोर वाढला असून शहरातील गजानन टॉकीज जवळ दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुख्यात गुंड समाधान मोरे आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या चाकू हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात पिता पुत्राचा समावेश आहे. तर हल्लेखोर फरार झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री 9 वाजेच्या दरम्यान गजानन टॉकीज जवळ विशाल पान सेंटरच्या बाजूला महावीर किराणा दुकान आहे. दुकानमालक अग्रवाल आणि समाधान मोरे याचे नातेवाईक बबन यांच्यात पैशाच्या व्यवहारातून वादविवाद झाले.

यात अग्रवाल यांच्याकडून संतोष पाटील (रा. जुनागाव) हे मध्ये पडले. परंतु समाधान मोरे, त्याचा भाचा रितेश आणि इतर दोन-तिन जणांनी संतोष पाटीलला मारहाण केली. हे कळल्यानंतर पाटील यांचा तरुण मुलगा तुषार आपला मित्र सनी पवार याला घेऊन महावीर किराणावर पोहोचले. त्याठिकाणी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. सनी पवार (कैकाडीपुरा) याचे वडील संजू पवार तिथेच होते. ते सुद्धा आपल्या मुलाला वाचविण्यासाठी मध्ये पडले. दरम्यान समाधान मोरे व त्याचा भाचा रितेश यांच्यापैकी कुणाकडे चाकू होता, की दोघांकडे होता याची निश्चित माहिती नाही.

परंतु त्यांच्या चाकू हल्ल्यात संतोष संतोष पाटील, सनी संजू पवार आणि सनीचे वडील संजू तिघेही गंभीर जखमी झालेत. तुषार याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. त्याचे लिव्हर् फाटलेत. तर संजू पवार यांच्या किडनीपर्यंत चाकू आत गेला. तर सनीची मांडी फाटली. तिघांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सनीच्या मांडीवर वार असल्यामुळे त्याला येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर तुषारच्या पोटातून भयंकर रक्तस्त्राव होत होता आणि संजू पवार यांच्या पोटातही चाकू लागल्यामुळे या दोघांना तातडीने औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड, त्यांचे पुत्र मृत्युंजय यांनी हॉस्पिटल गाठून जखमींची भेट घेतली. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील ऍम्ब्युलन्स मधून गंभीर जखमीना औरंगाबादला नेण्यात आले. दवाखान्यात शेकडो लोक जमा झाले होते. हल्ल्यानंतर समाधान मोरे आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तर शहरात दहशतीचे वातावरण आहे.

Protected Content