आयशरने दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठार

accident aisher

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील आंबेवडगाव ते मालखेडच्या दरम्यान आयशरने दिलेल्या धडकेत पती-पत्नीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथील रहिवासी मधुकर रामकृष्ण खैरे हे त्यांच्या पत्नीसह ( सौ. संगीता खैरे) पिंपळगाव हरेश्‍वर येथे अंत्यविधीसाठी जात होते. यातच आंबेवडगाव ते मालखेडच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला आयशरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

Protected Content