अथर्व हर्बल्सच्या वेबसाईटचे लोकार्पण ( व्हिडीओ )

atharav herbal website launch

भुसावळ प्रतिनिधी । येथील अथर्व हर्बल्स या ख्यातप्राप्त कंपनीच्या संकेतस्थळाचे लोकार्पण पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

भुसावळ येथील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निलेश महाजन संचलीत अथर्व हर्बल्स या कंपनीने अल्पावधीतच विविध प्रॉडक्टच्या माध्यमातून लोकप्रियता संपादन केली आहे. पिळोदेकर अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेड या आयएसओ २२०००: २००५ मानांकीत व जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)-जीएमपी प्रमाणित आयुर्वेदीक फार्ममधील औषधी वनस्पतींवर प्रक्रिया करून अथर्वने अनेक प्रॉडक्ट लाँच केले आहेत. यातील अथवे वॉक इझी या सांधेवातावर उपयुक्त असणार्‍या औषधाला उदंड लोकप्रियता लाभलेली आहे. तर अथर्वच्याच इम्युनिटी बुस्टर, सुपर वुमन, स्लीमर, अस्थिबंध, नीम कॅप्सुल, काम स्लीप आदी औषधेही विविध विकारांवर उपयुक्त ठरली आहेत. यातील बहुतांश औषधी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता ही कंपनी स्वत:च्या वेबसाईटच्या माध्यमातून डिजीटल पध्दतीत विक्रीतंत्राचा अवलंब करण्यासाठी सज्ज झालेली आहे. या अनुषंगाने कंपनीच्या संकेतस्थळाला कार्यान्वित करण्यात आले असून जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी. ना. गिरीश महाजन यांनी अथर्व हर्बलच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अथर्व हर्बलच्या वॉक इझीसह विविध प्रकारच्या प्रॉडक्टसाठी आपण ९३७३३०८३६० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

पहा : अथर्व हर्बल्सच्या वेबसाईटच्या लोकार्पणाबाबत व्हिडीओ वृत्तांत.

Protected Content